खातेवाटपातील पेच अखेर दूर : जळगाव जिल्ह्यातील गुलाबरावांसह गिरीशभाऊ, संजयभाऊ सावकारे यांची या खात्यांवर वर्णी !

गुलाबरावांकडे पाणीपुरवठा व स्वच्छता, गिरीश महाजनांकडे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तर भुसावळचे संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग खाते


जळगाव (21 डिसेंबर 2024) : राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी होवून खाते वाटपाचे घोडे अडले होते मात्र पेच मिटला असून भाजपाने गृह खाते स्वतःकडेच ठेवले आहे. नवीन चर्चेतील वाटाघाटीत गृह विभाग मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे नगरविकास शिंदेंकडे तर वित्त व नियोजन हे पुन्हा एकदा अजितदादा यांच्याकडे गेला आहे.

जिल्ह्यातील मंत्र्यांकडे मिळाली ही खाती
जळगाव जिल्ह्यातील गिरीश महाजन यांचेकडे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तर भुसाळचेआमदार संजय सावकारेंकडे वस्त्रोद्योग खाते व धरणगावचे आमदार गुलाबराव पाटील यांच्याकडे जुनेच खाते पाणीपुरवठा व स्वच्छता खाते देण्यात आले आहे.

असे आहे खाते वाटप

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, ऊर्जा, विधी व न्याय, प्रशासकीय विभाग, माहिती व जनसंपर्क

एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण

अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल

राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा व्हॅली विकास)

हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व संशोधन

चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य

गिरीश महाजन – जल संपदा (विदर्भ, तापी, कोंकण विकास कॉर्पोरेशन)

गणेश नाईक – वन खाते, गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता

दादाजी भुसे – शालेय शिक्षण, संजय राठोड – मृद व जलसंधारण

धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा, मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास व प्रशिक्षण, उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा, जयकुमार रावल – विपणन व राजशिष्टाचार, पंकजा मुंडे – पर्यावरण आणि पशुसंवर्धन, अतुल सावे यांच्याकडे ओबीसी कल्याण, दुग्धविकास, ऊर्जा निर्माण, अशोक उईके – आदिवासी विकास, शंभूराज देसाई – पर्यटन, खाणकाम, सेवानिवृत्त कल्याण, आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य, दत्तात्रय भरणे – क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक आणि औकाफ, आदिती तटकरे – महिला व बालविकास, शिवेंद्रसिंह भोसले – सार्वजनिक बांधकाम, माणिकराव कोकाटे – कृषी, जयकुमार गोरे – ग्रामविकास आणि पंचायती राज, नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन, संजय सावकारे – वस्त्रोद्योग, संजय शिरसाट – सामाजिक न्याय, प्रताप सरनाईक – परिवहन, भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री, मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन, नितेश राणे – मत्स्य व बंदरे, आकाश फुंडकर – कामगार, बाबासाहेब पाटील – सहकार, प्रकाश आबिटकर – आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री.

राज्यमंत्री
आशिष जयस्वाल : वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसनमंत्री, विधी व न्याय, कामगार.

माधुरी मिसाळ : नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ

डॉ. पंकज भोयर : गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खाणकाम

मेघना बोर्डीकर : आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम

इंद्रनील नाईक : उद्योग, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन,
मृद् व जलसंधारण

योगेश कदम : गृह (शहरी), महसूल, ग्रामीण विकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन


कॉपी करू नका.