गुलाबरावांचा देवकरांना स्पष्ट इशारा : ‘हम तो नही छोडेंगे’ !


जळगाव (24 डिसेंबर 2024) : स्पष्टवक्तेपणा ही कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी राहिलेले गुलाबराव देवकर यांच्याविरोधात अलीकडे गुलाबरावांनी केलेले वक्तव्य जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे. देवकर यांचा भ्रष्ट्राचार उघड करणार म्हणजे करणार, असे ठणकावून त्यांनी सांगितले आहे.

गुलाबराव देवकर यांच्यावर सडकून टीका
जळगाव ग्रामीण मतदारसंघातून देवकर यांना चितपट करून विजयी पैलवान ठरलेले गुलाबराव पाटील यांना सलग चौथ्यादा मंत्रिपदाची संधी मिळाली असतांना त्यांचे प्रतिस्पर्धी माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर सत्ताधारी महायुतीत प्रवेशासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रारंभी त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती पण स्थानिक पदाधिकार्‍यांनी त्यांच्या प्रवेशाला कडाडून विरोध केला.
आपली राष्ट्रवादीत डाळ शिजत नसल्याचे पाहून त्यांनंतर देवकर हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या झळकू लागल्या आहेत. याबाबत जिल्ह्यात आगमन झालेले नवनियुक्त मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता त्यांनी गुलाबराव देवकर यांच्यावर सडकून टीका केली.


गुलाबराव देवकर हे नकली गुलाबराव असून असली इधर है… म्हणजे मीच आहे, असे कार्यकर्त्यांना ते म्हणाले. देवकर यांनी सोबतच्या कार्यकर्त्यांची गोची केल्याचे सांगत त्यांनी देवकरांचा चांगलाच पाणउतारा केला.

बँक व मजुर फेडरेशनमधील घोटाळ्यातून बचावसाठी तडफड
गुलाबराव देवकर यांनी जळगाव जिल्हा बँकेतून स्वतः चेअरमन व संचालक असतांना आपल्या मालकीच्या शिक्षण संस्थेसाठी पैसे वापरले असून असाच प्रकार त्यांनी जिल्हा सहकारी मजूर फेडरेशनमध्ये सुद्धा केला आहे. आपला भ्रष्ट्राचार उघड न होण्यासाठी देवकर कधी अजितदादा तर कधी भाजपाच्या नेत्यांना भेटून महायुतीचे दरवाजे ठोकत आहे. पण मी त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढेल म्हणजे काढेल त्यांना सोडणार नाही, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !