लाडक्या बहिणींसाठी खुषखबर : डिसेंबर महिन्याचा हप्ता 31 डिसेंबरपूर्वी खात्यात होणार जमा


मुंबई (24 डिसेंबर 2024) : महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत लाभदायी ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता खात्यात जमा न झाल्याने त्याबाबत उत्सुकता लागून होती मात्र योजनेसाठी निधीची तरतूद केल्यानंतर 31 डिसेंबरपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

डिसेंबरपूर्वी जमा होणार क्कम
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, आठवडाभरात लाडक्या बहिणींचे पैसे दिले जातील. डिसेंबरचा हप्ता आठवडाभरात देऊ. आता 31 डिसेंबरच्या आतच सहाव्या हफ्त्याचे पैसे मिळतील. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, महायुतीने सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. आता 2100 रुपये कधी मिळणार याची वाट लाडक्या बहिणी पाहत आहेत.


अनेकांच्या खात्यात पैसे येण्यास सुरूवात
डिसेंबर अखेरपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार असलेतरी प्रत्यक्षात मात्र अनेकांच्या खात्यात पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. अद्याप 31 डिसेंबरसाठी आठवडाभराचा कालावधी शिल्लक आहे मात्र निधी वितरणामुळे अनेकांच्या खात्यात ही रक्कम येवू लागल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सरसकट अर्जांची पडताळणी होणार नसलीतरी ज्या भागातून तक्रारी येतील तेथे पडताळणी केली जाणार आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !