लष्कराचे वाहन दरीत कोसळून पाच जवान शहीद : तीन बेपत्ता, दहा गंभीर


जम्मू काश्मीर (24 डिसेंबर 2024) : लष्कराच्या जवानांना घेवून निघालेले वाहन दरीत कोसळून मोठा अपघात झाला असून त्यात पाच जवान शहीद झाले आहे तर दहा जवान गंभीर जखमी व तिघे बेपत्ता झाले आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दरम्यान, मराठा रेजिमेंटचे हे जवान असल्याची माहिती आहे.

काय घडले नेमके ?
लष्कराचे वाहन मंगळवारी संध्याकाळी सर्व सैनिक नियंत्रण रेषेकडे घेवून जात असताना बलनोई परिसरातील घोडा पोस्टजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच लष्कराची क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य सुरू केले. जखमी जवानांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

यापूर्वी नोव्हेंबरमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जवान शहीद झाले होते. 4 नोव्हेंबर रोजी राजौरी येथे दोन नाईक सैनिकांना रस्ता अपघातात प्राण गमवावे लागले. त्याच वेळी, 2 नोव्हेंबर रोजी रियासी जिल्ह्यात कार खड्ड्यात पडल्याने तिघांचा मृत्यू झाला.

भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन मृत जवानांबद्दल शोक व्यक्त केला. पुंछ सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटीवर असताना वाहन अपघातात पाच शूर सैनिकांच्या दुःखद मृत्यूबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. जखमी जवानांना वैद्यकीय सेवा दिली जात आहे, असे या पोस्टमध्ये म्हटले.

 

https://x.com/Whiteknight_IA/status/1871556332592984191?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1871556332592984191%7Ctwgr%5E8bf40124ee7906fb5a744e72b3c5c9d7f4889154%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fnational%2Farmy-vehicle-falls-into-350-feet-deep-gorge-5-soldiers-killed-many-injured-a-a732%2F


कॉपी करू नका.