मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा डिवचले : आता हिशोब चुकता करण्याची वेळ


Manoj Jarange again challenges the Chief Minister: Now is the time to settle accounts परभणी (25 डिसेंबर 2024) : परभणी दौर्‍यावर आलेल्या मराठा समाजोचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा डिवचले आहे. आता हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. होऊ द्या आता. पहिले हा दुसर्‍यांवर ढकलत होता ना, मी विरोध करत नाही, मी द्या असे म्हणतो. आता कळेल आरक्षण देतो की नाही ते, या शब्दांत मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणार्‍या मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला.

25 जानेवारीपासून उपोषण सुरू करणार
25 जानेवारी 2025 पासून आम्ही अंतरवालीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहोत. मराठा आरक्षणासाठी लढा देणार आहे. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा सरकारला भयंकर आंदोलन बघावे लागेल. राज्यभरातील मराठ्यांनी आंतरवलीकडे यायचे आहे. मराठ्यांची ताकद पुन्हा एकदा दाखवा. सर्वांनी स्वतः हा मेसेज सोशल मीडियावर पोस्ट करा. हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचे आहे, असे आदेश मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना दिले आहेत.


मनोज जरांगे परभणीत सूर्यवंशी कुटुंबीयांची तर मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबीयांचीही सांत्वनपर भेट घेणार आहेत. कोणाचेही बाप येऊ द्यात, ते मॅटर मी दबू देणार नाही. कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटणार नाही. सरकारला एकमेकांना मोबाइलचे फोन केलेले तपासायला एवढे दिवस लागतात का, अशी विचारणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !