गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हवी कारवाई : भुसावळात प्रशासनाला निवेदन
भुसावळ (25 डिसेंबर 2024) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गृहमंत्री पदावरून तत्काळ कार्यमुक्त करावे तसेच राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे बोजबारा उडाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नैतीक जवाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभाग व भुसावल काँग्रेस कमेटीतर्फे प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली.
गृहमंत्र्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याने देशभरातील संविधान प्रेमी नागरीकांमध्ये संतापाची लाट आहे. बेताल वक्तव्य करणार्या व देशात शांतता भंग होईल, असे वक्तव्य करणार्या अमित शहा यांना कार्यमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्रातील परभणी शहरातील पोलीस कोठडीत भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांचा झालेला मृत्यू तसेच मस्साजोग, जिल्हा बीड सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व परभणी शहरात संविधानची झालेली विटबंना पाहता राज्यात कायदा सुव्यवस्था संपल्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मो.मुनव्वर खान, इंटक तालुकाध्यक्ष विलास खरात, जगपाल सिंह गील, सेवादल शहराध्यक्ष संजय खडसे, महिला शहराध्यक्ष यास्मीन बानो, शहराध्यक्ष सलीम गवली, महिला सचिव राणी खरात, महिला शहर उपाध्यक्ष वंदना चव्हाण, राजु सोनवणे, विठाबाई अहिरे, आशा पटोले, जॉनी गवळी, रमजान खाटीक, अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




