सरपंच हत्याकांडातील आरोपींचा खून झाल्याचा दावा : अंजली दमानियांना बीड पोलिसांची नोटीस


मुंबई (29 डिसेंबर2024) : सामाजिक कार्यकर्त्या आणि आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी बीडमधील गुन्हेगारीवर अचूक बोट ठेवत फोटो ट्वीट केले होते शिवाय अलीकडे मुंडे यांचा हातात पिस्टल घेतलेला फोटोही एक्सवर टाकत लक्ष वेधले होते. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या पसार मारेकर्‍यांचा खून झाल्याचा दावा त्यांनी एका कॉलद्वारे केल्यानंतर बीड पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. पसार आरोपींच्या संदर्भात जो दावा करण्यात आाल त्याचे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.

काय आहे दमानियांचा दावा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर अंजली दमानिया यांनी एका कॉलचा हवाला देत संतोष देशमुख हत्याकांडातील पसार आरोपींचा खून झाला, असा दावा केला होता. या दाव्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी बीड पोलिसांनी अंजली दमानिया यांना नोटीस पाठवली. बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांनी अंजली दमानिया यांना नोटीस बजावली आहे. ज्या मोबाईल नंबरवरून व्हॉइस मेसेज आलेत, तो मोबाईल नंबर, व्हॉइस मेसेज, इतर माहिती आणि पुरावे द्यावे, असे नोटीसीमध्ये नमूद करण्यात आहे.


तर निश्चितपणे माहिती देणार
माझ्याकडे आलेली माहिती मी त्या मिनिटालाच एसपींकडे पाठवली होती. त्याचे व्हॉइस मेसेज देखील मी पाठवले होते, सगळे डिटेल्स त्यांना दिले आहेत. डिलीट झालेल्या पहिल्या दोन मेसेजची देखील माहिती मी पोलिसांना दिली मात्र नोटीस आल्याचे आश्चर्य वाटते, असे दमानिया म्हणाल्या. स्थानिक गुन्हे शाखेला ही माहिती हवी असेल, तर त्यांना मी माहिती देणार असल्याचे अंजली दमानिया यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !