मग वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा सवाल


Will Valmik Karad’s wealth be there then? Anjali Damania’s question मुंबई (29 डिसेंबर 2024) : हत्याकांडातील संशयीत वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? असा सवाल सामाजिक कार्यकत्यार्र् अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. अजित पवारांचे नाव घेऊन फडणवीसांकडे स्पष्टीकरण मागितले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करावी, असे आदेश मुखमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला दिल्यानंतर दमानियांनी सीएम यांच्यावर निशाणा साधला.

काय म्हणाल्या दमानिया?
फरार आरोपींची संपत्ती जमा करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे मात्र, त्यात वाल्मिक कराडचे नाव आहे की नाही? याची स्पष्टता त्यांनी दिलेली नाही त्यामुळे वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार की नाही? असा सवाल अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना केला. अजित पवारांची 1000 कोटींची संपत्ती त्यांना पुन्हा वरदान म्हणून देण्यात आली, तशीच फरार आरोपींची जप्त झालेली संपत्ती तुम्ही पुन्हा देणार असाल, तर हे चालणार नाही, असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला.


एकदा जप्त झालेली संपत्ती कोणत्याही कारणाने आरोपींना परत दिली जाणार नाही, असे तुम्ही स्पष्ट लिहून आदेश द्या, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

निर्णयाचे स्वागत, पण…
अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीसांच्या शस्त्र परवाने रद्द करण्याच्या आदेशाचे स्वागत केले. शस्त्र आहेत, पण परवाने नाहीत, असे अनेक लोक आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करणार? दहशत पसरवणार्‍यांवर काय कारवाई करणार? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस काही म्हणाले नाहीत. याबाबत त्यांनी खुलासे करावेत, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !