सुदृढ आरोग्यासाठी रोटरी रनमध्ये धावले भुसावळकर !
रोटरी रेल सिटीतर्फे आयोजन : दहा, पाच व तीन किमीसाठी स्पर्धा
Bhusawalkar ran in Rotary Run for good health! भुसावळ (29 डिसेंबर 2024) : सुदृढ आरोग्यासाठी पहाटेच्या आल्हाददायी वातावरणात शहरातील सर्वच वयोगटातील साडेसहाशेवर भुसावळकर रोटरी रनमध्ये रविवारी सहभागी झाले. रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे रविवार, 29 रोजी ‘रेल सिटी रन’ या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. दहा, पाच व तीन किलोमीटर अंतरासाठी स्पर्धा झाली. स्पर्धेची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून झाली. दहा किलोमीटरसाठी हॉटेल मधुमंधापर्यंत, पाच किलोमीटर नाहाटा तर तीन किलोमीटर अष्टभुजा मंदिरापर्यंत व पुन्हा स्पर्धास्थळ असा मार्ग निश्चित करण्यात आला.
यांची प्रमुख उपस्थिती
स्पर्धेचे उद्घाटन ओबेनॉल फाउंडेशनचे अश्विन परदेशी व ब्रँड अॅम्बेसीडर प्रवीण फालक, यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी रेल सिटीचे सदस्य व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे, देवेंद्र गीते, मयूर कुरकुरे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, डॉ.तुषार पाटील यांची उपस्थिती होती.
यांनी पटकावला क्रमांक
या स्पर्धेमध्ये दहा किलोमीटर अंतरात प्रथम- संजय भदाणे प्रथम, द्वितीय- डॉ.तुषार पाटील, तृतीय मुकेश चौधरी यांनी पटकावला. डॉ.पाटील यांनी त्यांचे बक्षीस चतुर्थ क्रमांक विजेता निलेश पाटील यांना दिले. 40 वर्षावरील गटात प्रथम- सीमा पाटील, द्वितीय- विना परदेशी, तृतीय- स्वाती फालक यांनी पटकावले तर दहा किलोमीटरमध्ये 40 वयाखालील वयोगटात प्रथम- बबलू चव्हाण, द्वितीय- कमलाकर देशमुख, तृतीय सागर परदेशी यांनी पटकावला. दहा किलोमीटर गटात महिलांच्या 40 वर्षाखाली गटात वैशाली कोळी यांचा एकमेवश सहभाग राहिला. पाच किलोमीटरमध्ये प्रथम- ग्रॅण्ड सिंग चंदेल, द्वितीय- दीपक गायकवाड, तृतीय- दीपक काटकर तर महिलांमध्ये प्रथम- मनीषा गरुडे, द्वितीय- वैष्णवी कुमावत, तृतीय- तेजस्विनी ढाके. तीन किलोमीटरमध्ये प्रथम- प्रमोद शिरसाट, द्वितीय- सुनील बारेला, तृतीय- अर्जुन बोयत तर महिलांमध्ये प्रथम- ममता कुलकर्णी, द्वितीय- पूजा लोधी, तृतीय- शीतल परदेशी यांनी पटकावला.
हे आहेत लकी ड्रॉ चे विजेते
विजेत्यांना रोख बक्षिसे, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देण्यात आला. सहभागी सर्व स्पर्धकांना सर्टिफिकेट आणि मेडल प्रदान करण्यात आले. सर्व स्पर्धकांसाठी सकस आहार उसळ हा नाश्त्यासाठी ठेवण्यात आला. लकी ड्रॉ मध्ये कोमल तायडे, आदित्य झांबरे, श्रावणी भारंबे, धनंजय पाटील, शिवम मंत्री, शेख तौफिक, अर्चना शिरतुरे, अमोघ चांदवडकर, खुशबू, रेणुका सोनवणे यांना स्मार्ट वॉच, ब्लूटूथ स्पीकर आणि एक मायक्रोवेव्ह ओव्हन अशी बक्षिसे मिळाली.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
स्पर्धा यशस्वीतेसाठी रोटरी रेल सिटीचे अध्यक्ष विशाल शाह, सचिव अनिल सहानी, प्रोजेक्ट चेअरमन उमेश घुले, प्रोजेक्ट को.चेअरमन सुयश न्याती, सर्व रोटरी बांधव तसेच इनरव्हील रेलसिटी, स्पोर्ट्स टीचर असोसिएशन, देवेंद्र गीते एनर्जील वॉटर, रन बडीज टेक्निकल सपोर्ट यांनी परिश्रम घेतले.