जळगावात शॉर्ट सर्किटने आग : चटई कंपनीचे लाखोंचे नुकसान


Fire due to short circuit in Jalgaon : Carpet company loses lakhs जळगाव (30 डिसेंबर 2024) : शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याने जळगाव एमआयडीसी हद्दीतील चटई कंपनीतील तयार माल व कच्च्या मालाचा प्रचंड साठा जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कंपनीतील कुलरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे कामगारांनी सांगितले. रविवारी रात्री 11.15 वाजेच्या सुमारास आगीची घटना समोर आली.

जिल्ह्यातून आले बंब
जळगाव एमआयडीसीतील डी 66 येथील सिद्धिविनायक चटई फॅक्टरीला रविवारी रात्री 11.15 वाजता आग लागली. सुदैवाने आगीत कुणीही जखमी झालेला नाही. आग विझवण्यासाठी जळगावसह भुसावळ, वरणगाव, दीपनगर, चाळीगाव अशा विविध ठिकाणचे आठ ते दहा अग्निशमन बंब मागवण्यात आले.

रविवारी रात्रीच्या तिसर्‍या शिफ्टसाठी कामावर आलेले दहा ते पंधरा कामगार आग लागल्यानंतर बाहेर निघाले. त्यानंतर आगीने रौद्ररुप धारण केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाददेखील घटनास्थळी दाखल झाले.


कॉपी करू नका.