जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा ; वाल्मीक कराड आज शरण येणार !


मुंबई (31 डिसेंबर 2024) : राष्ट्रवादी काँग्रेस शरणचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मीक कराड पोलिसांना शरण येणार असल्याचा दावा केला आहे. सोमवारी वाल्मीक कराड खरेच शरण येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून आव्हाड यांनी कराड शरण येणार असलातरी त्याला फरफटत आणत असल्याचा आवदेखील आणला जाणार असल्याचा दावा ेला आहे

पण पोलिस कॉलर पकडून आणल्याचा आव करणार
जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले आहे. ही माहिती मी का देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर, एक पत्रकार परिषद घेण्यात येईल. या पत्रकार परिषदेत, त्याला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून गोवा किंवा असे कुठे तरी लांब जात असल्याची माहिती पोलिसांना खबरींकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या गाडीसमोर आडवी गाडी टाकून त्याला अडविला आणि त्याच्या कॉलरला धरून त्याला खेचत आणून गाडीत बसवला, अशा सगळ्या कहाण्या प्रसृत करण्यात येतील.


पण, महाराष्ट्राने अशा कुठल्याही कहाण्यांवर विश्वास ठेवू नये. कारण त्याला पकडायचा असता तर त्याला कधीच पकडला असता. तो शानमध्ये, कडक कपडे घालून पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्या तरी पोलीस ठाण्यात येईल आणि स्वतःहून स्वाधीन होईल. पण, त्याला रंग मात्र शौर्याचा देऊन त्याला कसा फरफटत आणला, अशा बातम्या लावायला सुरूवात केली जाईल. मला या सरकारला एवढेच सांगायचे आहे, जो बूंद से गयी हो हौद से नही आती.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !