अवैध वाळू रडारवर यावलला 12 डंपरसह तीन जेसीबी व ट्रॅक्टर जप्त

गौण खनिज वाहतूक करणार्‍या वाहनासंदर्भात वॉश आऊट


यावल (31 डिसेंबर 2024) : शहर व तालुक्यात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून सहायक पोलीस अधीक्षक व पोलीस निरिक्षकांच्या पथकाने गौण खनिज वाहतूक करणार्‍या वाहन धारकांविरुद्ध वॉश आऊट मोहिम राबवली. यात वाहनांच्या परवाना सह विविध कागदपत्र तपासणीकरिता दोन दिवसात तब्बल 12 डंपर, तीन जेसीबी व तीन ट्रॅक्टर पकडण्यात आले.

कारवाईने उडाली खळबळ
शनिवारी या सर्व वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित मालकांना वाहन सोपवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. काही वाहनांचे मालक सायंकाळपर्यंत उपस्थित होऊ शकले नव्हते. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या आदेशांवर यावल शहर व तालुक्यात गौण खनिज वाहतूक करणार्‍या वाहनांविरुद्ध वॉश आऊट मोहिम राबवण्यात आली. यामध्ये संबंधित वाहन चालकाकडे परवाना आहे का ?, वाहनांचे व्यवस्थित कागदपत्र आहेत का ?, वाहनाचा विमा आहे का ?, आरटीओ परवानगी आहे का ?, याची तपासणी आता पोलीस पथकाकडून केली जात आहे. या विशेष मोहिमेद्वारे फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार अर्षद गवळी, मुकेश पाटील, अस्लम खान या पथकाने तब्बल 12 डंपर, तीन जेसीबी, तीन ट्रॅक्टर पकडले.

पकडण्यात आलेले सर्व वाहन हे भुसावळ रस्त्यावरील पेट्रोल पंपाच्या आवारात सुरक्षित लावण्यात आले होते. या ठिकाणी शनिवारी सायंकाळी सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या उपस्थितीत वाहन मालकांना बोलवून कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर वाहन सोडण्यात येत होते.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !