मस्साजोग सरपंच हत्याप्रकरणातील संशयीत वाल्मीक कराड पुण्यात सीआयडीला शरण


walmik karad पुणे (31 डिसेंबर 2024)  : सरपंच हत्येमुळे चर्चेत आलेला बीडमधील वाल्मीक कराड (walmik karad) अखेर पुण्यात सीआयडीला सोमवारी दुपारी शरण आला. तत्पूर्वी त्याने व्हिडिओवरून शरण जात असल्याची माहिती दिली. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणातील खंडणी प्रकरणात वॉण्टेड आरोपी वाल्मीक कराड शरण आल्यानंतर सीआयडीकडून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. वाल्मीक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.

व्हिडिओद्वारे दिली होती माहिती
वाल्मीक कराड याने मंगळवारी सकाळी एका व्हिडिओद्वारे आपण पुण्यातील सीआयडी कार्यालयात सरेंडर करणार असल्याचे सांगितले होते. तो आपल्या व्हिडिओत म्हणाला, मी वाल्मीक कराड. माझ्याविरोधात बीडच्या केज पोलिसात खंडणीची खोटी फिर्याद दाखल केली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना मी पुणे सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे.


संतोष देशमुख यांचे मारेकरी जे कुणी असतील त्यांना अटक करून फाशीची शिक्षा दिली जावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे. पोलिस तपासाच्या निष्कर्षात मी दोषी आढळलो तर मी न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे.

तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस शरणचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मीक कराड आज सरेंडर करणार असल्याचा दावा केला होता. त्यांनी ही माहिती आपल्याला वाल्मीक कराड यांच्या निकवर्तीयांनीच दिल्याचे सांगितले होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !