डोंगरदेत गावठी दारू विक्री करणार्‍याला पकडले


यावल (31 डिसेंबर 2024) : यावल तालुक्यातील डोंगरदे येथे एका घराच्या आडोशाला अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशातून एक जण आल्यानंतर यावल पोलिसांनी त्यास ताब्यात घेत 35 लीटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. संशयीताविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
डोंगरदे गावातील एका घराच्या आडोशाला गुरुजी रामदास पावरा हा गावठी हातभट्टीची दारू एका 35 लिटरच्या कॅनमध्ये विक्री करण्याच्या उद्देशातून बसला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळताच त्यांनी या ठिकाणी हवालदार सुनील पाटील, एजाज गवळी, न्याजुद्दीन तडवी, हर्षद गवळी या पथकाला पाठवले व या पथकाने तेथे जाऊन कारवाई करत त्याच्याकडून दोन हजार रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारू जप्त करणयात आली. संशयीताविरोधात यावल पोलीस ठाण्यात एजाज गवळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हवालदार सुनील पाटील करीत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !