वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करा : भीम आर्मी संघटनेची मागणी


बीड (31 डिसेंबर 2024) : मस्साजोग सरपंच खून प्रकरणातील संशयीत आरोपी वाल्मीक कराडचे एन्काऊंटर करा, अशी खळबळजनक मागणी भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. बीड येथील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयीत कराड मंगळवारी दुपारी पुण्यात सीआयडीला शरण आल्यानंतर त्याला केजमध्ये हलवण्यात आले आहे.

कराड बीडमध्ये लपल्याचा दावा
अशोक कांबळे यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एन्काऊंटर करण्याची मागणी केली आहे. अशोक कांबळे म्हणाले, संतोष देशमुख प्रकरणात न्याय मिळताना दिसत नाहीये, कराड नावाचा व्यक्ती कुठे लपला होता? आम्हाला माहीत आहे की तो बीडमध्येच होता.


पुढे बोलताना अशोक कांबळे म्हणाले, हे सरकार वाल्मीक कराडला वाचवण्यासाठी काम करत आहे. संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी हे सरकार काम करत नाहीये. लवकरच आम्ही देशभरातील अन्यायग्रस्त लोकांना बोलावणार आहोत. आझाद मैदनावर निषेधार्थ आम्ही सभा घेऊ. यंत्रणा जर खरेच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी काम करत असतील तर आतापर्यंत वाल्मीक कराड याचा एन्काऊंटर झाला असता.

जे जे आरोपी या प्रकरणात आहेत, त्यांचा एन्काऊंटर झाला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. भर रस्त्यामध्ये आरोपींचा एन्काऊंटर झाला पाहिजे, जे पोलिस हे कृत्य करतील त्यांचे संरक्षण आम्ही करू. जनता कायदा हातात घेणार नाही, जनतेला कायद्याने न्याय मिळवून घ्यायला येतो, असे अशोक कांबळे यांनी म्हणाले आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !