अंजली दमानियांचा खळबळजनक दावा : परळीतील औष्णिक विद्युत प्रकल्पातील राख उचलण्यासाठी गुंडगिरी
परळी (1 जानेवारी 2025) : बीडच्या परळी येथील औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखेबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. राख उचलण्यासाठी प्रचंड गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.
काय म्हटल्या दमानिया
अंजली दमानिया बुधवारी आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाल्या, काल महाजनकोच्या थर्मल प्लँटमध्ये येथे जाऊन राखेचा विषय समजून घेतला. प्रचंड दहशत, गुंडगिरी करून इथून बेकायदेशीररित्या राख नेली जाते.

पोलिसांना कित्येक वेळा तक्रार देऊन देखील काहीच कारवाई नाही. एकदा तर 400 गुंड घेऊन दहशत निर्माण केली आणि विनवणी करुन सुद्धा एकही पोलिस फिरकले पण नाही. इतका राजकीय वरदहस्त आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.




