भुसावळात श्री संताजी जगनाडे महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन


भुसावळ (1 जानेवारी 2025) : जगतगुरु तुकाराम महाराजांच्या मुळ गाथेचे लेखनकर्ते आपल्या अभंगातून समाजसुधारणेची व मानवतेची शिकवण देणारे, तेली समाजाचे आराध्य दैवत थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त शहरातील तेली समाजबांधवांनी पूजन करून विनम्र अभिवादन केले .

समाज कार्यात सहभागी व्हावे : उज्वला बागुल
सुरुवातीला अध्यक्ष संजय चौधरी, कैलास चौधरी, अशोक चौधरी, कविता चौधरी, सुरेश चौधरी, गणेश सोनवणे यांनी दीपप्रज्वलन केले. वत्सला सुखराम सोनवणे यांनी श्री संताजी महाराजांची आरती व अभंग सादर केले. रेखा धुपे यांनी संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. उज्वला बागुल यांनी महिलांनीही पुढे येऊन समाज कार्यात सहभागी व्हावे, असे आवहान केले. प्रदीप चौधरी यांनी सामाजिक कार्यक्रमात येणार्‍या अडचणी सांगून त्यात सुधारणा करण्याचे आवाहन केले.

यांची होती उपस्थिती
रमेश चौधरी, नारायण चौधरी, अरुण चौधरी, एल.पी.चौधरी, संतोष चौधरी (दाढी), कैलास चौधरी, चंद्रकांत चौधरी, उमाकांत चौधरी, देविदास तेली, निलेश चौधरी, अनिल चौधरी, भूषण चौधरी, गणेश चौधरी, संतोष पुंडलिक चौधरी, एस.टी.चौधरी, अरुण चौधरी, जीवन पाटील, संतोष धुपे, सुरज ठाकरे, मोहन पैठणकर, रघुनाथ चौधरी, बाबुराव चौधरी, सुदाम सोनवणे, किशोर चौधरी, शंकर चौधरी, चंद्रकांत बागुल यांच्यासह समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सचिव अशोक चौधरी तर आभार सुनील चौधरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी अध्यक्ष संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश चौधरी, अशोक चौधरी, सुधाकर पाटील, सुनील चौधरी, गणेश सोनवणे, बाळू चौधरी, दिलीप चौधरी, देविदास चौधरी, गोपाल चौधरी, किरण चौधरी, विजय चौधरी, राकेश चौधरी, नरेंद्र चौधरी, प्रदीप चौधरी, सुनील चौधरी यांनी परिश्रम घेतले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !