अवघ्या तीन तासात 524 वरणगावकरांनी स्वीकारले भाजपाचे सदस्यत्व
भाजपा सदस्य अभियानात 10 हजारांचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य
भुसावळ (1 जानेवारी 2025) : भारतीय जनता पार्टी सदस्य अभियानाचा प्रारंभ मंगळवारी वरणगावातील तिरंगा सर्कल येथे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, जिल्हा सरचिटणीस वैशाली कुलकर्णी, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, शहराध्यक्ष सुनील माळी यांच्याहस्ते करण्यात आला. अवघ्या तीन तासात 524 वरणगावकरांनी भाजपा सदस्यत्व स्वीकारले.
दहा हजार सदस्य नोंदणीचे लक्ष
नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनता समाधानी आहे शहरातील प्रत्येक वॉर्डातील 10 हजार वरणगावकरांना सदस्य करून घेणार असल्याचे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले. सेवानिवृत्त शिक्षक आर.ए.तांबे यांच्यासमवेत लता शर्मा, रश्मी शर्मा, रोहिदास चौहान, विश्वनाथ माळी, रमेश माळी, सुनील परदेशी, साजीद शेख, अकभर शेख यांच्यासह 524 वरणगावकरांनी भाजपात प्रवेश केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, नंदू जोशी, रमेश पालवे, अनिल वंजारी, मयूर शेळके, पंकज चौधरी, योगेश माळी, डॉ.नाना चांदणे, बळीराम सोनवणे, नामदेव सोनवणे, गोलू राणे, संतोष पाटील, कृष्णा महाजन, पप्पू ठाकरे, हाजी अल्लाद्दीन सेठ, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, कामगार नेते मिलिंद मेढे, नाना चौधरी, गजानन वंजारी, ज्ञानेश्वर घाटोळे, सुभाष पोतदार, भाउलाल टिंटोरे, भाजपा शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, भोजराज पालवे , संतोष नारखेडे, मुस्लीम अन्सारी, फजल शेख, डॉ.सादीक शेख, सविता माळी, लता धोबी, डी.के.खाटीक, समाधान कोळी, किरण वंजारी आदी उपस्थित होते.




