भोर येथे वीज चोरी : दंड न भरणार्‍या सात जणांविरोधात गुन्हा


यावल (2 जानेवारी 2025) : रावेर येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ग्रामीण कक्षाकडून भोर गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. यामध्ये त्यांना सात जण वीज चोरी करतांना आढळले. त्यांना वीज युनिट नुसार दंडाची आकारणी करून नोटीस देण्यात आली मात्र या सात जणांनी दंड न भरल्याने यावल पोलीस ठाण्यात या सात जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले नेमके ?
भोर गावात विद्युत वितरण कंपनीच्या रावेर ग्रामीण कक्षाचे कनिष्ठ अभियंता संतोष जाधवांसह पथकाने 7 सप्टेंबर 2024 रोजी वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवली. यामध्ये त्यांना पवन मनोहर पाटील, वत्सलाबाई बाळकृष्ण नांदले, अंजनाबाई सुधाकर शिंदे, देविदास नारायण मोरे, आनंदा गणपत कोळी, संदीप एकनाथ मोरे व शेख रशीदा बी.शेख रसूल हे सात जण वीज चोरी करतांना आढळले. सात जणांनी तब्बल तीन हजार 607 युनिट वीज चोरी केली होती. त्यांनी चोरी केलेल्या विजेनुसार त्यांना 62 हजार 278 रुपयांचा दंड व तडजोड रक्कम 14 हजार आकारून नोटीस देण्यात आली. मात्र या सर्व सात जणांनी दंड न भरल्याने यावल पोलीस ठाण्यास संतोष जाधव यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पाटील करीत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !