खताच्या पिशवीवर अतिरिक्त सबसिडी
नवी दिल्ली (2 जानेवारी 2025) : नवीन वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने खताच्या पिशवीवर अतिरिक्त सबसिडी जाहीर केली आहे .आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या किंमतींमुळे शेतकर्यांना होणारी परतवाळणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने 50 किलोच्या डीएपीच्या बॅगेवर अतिरिक्त सबसिडी जाहीर केली आहे. यामुळे शेतकर्यांना ही खताची बॅग यापुढेही 1350 रुपयांना मिळत राहील. यासाठी 3850 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे
पीक विमा योजनांना मुदतवाढ
पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान आधारीत पीक विमा योजनांना 2025-26 पर्यंत सुरु ठेवण्यास कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. या योजनांसाठी 69515 कोटी रुपये देण्यात आले आहेत. पंचनामे, विमा परतावा आदी बाबींसाठी 800 कोटी रुपये देण्यात आले आहेत. या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि अर्ज प्रक्रिया सोपी करण्यासाठी पूर्णपणे डिजिटल करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे,





