दाढी, कटिंग, ब्युटी पार्लरच्या सेवेत 25 टक्के दरवाढ
मुंबई (2 जानेवारी 2025) : महाराष्ट्र राज्य सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनने सलून आणि ब्युटी पार्लरच्या सेवेत 20 ते 25 टक्क्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबांवर दरवाढ परिणामकारक
महाराष्ट्र राज्य सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनने ग्रामीण व शहरी भागातील सुविधा नुसार दरवाढीचा विचार केला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी सांगितले की, वाढत्या खर्चांमुळे ही दरवाढ आवश्यक आहे. सामग्रीच्या किमती, कर्मचारी वेतन आणि इतर खर्चांमध्ये वाढ झाली आहे, आता केस कापणे, दाढी कापणे, ब्युटी ट्रीटमेंट्स आणि इतर सेवा या सर्व गोष्टींसाठी ग्राहकांना जास्त पैसे द्यावे लागतील. मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांवर ही दरवाढ जास्त परिणाम करेल,





