पहिल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत या निर्णयांना मिळाली मंजुरी


मुंबई (2 जानेवारी 2025) : राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारासह पड जमिनीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय खाते वाटपानंतर महायुती सरकारच्या गुरुवारी पहिल्याच बैठकीत झाला.

आरोपांची राळ असलेल्या मंत्री मुंडे यांची उपस्थिती
बीडमधील वाल्मिक कराड प्रकरणात आरोपांच्या केंद्रस्थानी असलेले व आरोपांची राळ उठलेले मंत्री धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित होते. . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी 12 वाजता झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. शासकीय कर्मचार्‍यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली. मुंबई बँक ही भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याशी संबंधित असल्यामुळे विरोधक यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे.


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966च्या कलम-220 मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय (महसूल विभाग). शासकीय कर्मचार्‍यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !