तीन अपत्याचा फटका : परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतीचे तीन सदस्य अपात्र


यावल (3 जानेवारी 2025) : यावल तालुक्यातील परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांच्या विरुद्ध दोन नागरीकांनी तीन अपत्य असल्याची तक्रार जिल्हाधिकारी. जळगाव यांच्याकडे केली. या तक्रारीवर 30 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निकाल जाहीर करीत तिघांना तीन अपत्य असल्याने अपात्र घोषित केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण
परसाळे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सदस्य खल्लोबाई युनूस तडवी यांच्याविरुद्ध कमल कान्हा तडवी यांनी तीन अपत्य असल्याची तक्रार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली होती. त्याचप्रमाणे सिकंदर इस्माइल तडवी यांनी ग्रामपंचायत सदस्य मदीना सुभेदार तडवी व रमजान छबू तडवी या दोघांना देखील तीन अपत्य असल्याची तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या न्यायालयात कामकाज चालले. दोन्ही तक्रारदारांकडून अ‍ॅड.विश्वासराव देशमुख यांनी कामकाज पाहत सक्षमपणे बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर 30 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश काढत तीन अपत्य असलेल्या खल्लोबाई तडवी, मदिना तडवी व रमजान तडवी या तिघांना अपात्र घोषित केले आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या या निकालामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

विधानसभा लढवणार्‍या ग्रामपंचायतीमधूनही अपात्र
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये खल्लोबाई युनूस तडवी यांनी रावेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी केली होती. यात त्यांना अत्यल्प मतं मिळाली होती तर आता ग्रामपंचायतीतून देखील त्यांच्यावर तीन आपत्य प्रकरणे अपात्र होण्याची वेळ आली आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !