भुसावळात शॉर्ट सर्किटने ओमनी पेटली : गॅरेजला आगीची झळ
Omni catches fire due to short circuit in Bhusawal : Garage catches fire भुसावळ (3 जानेवारी 2025) : शहरातील जामनेर रोडवरील न्यु. महालक्ष्मी मोटर गॅरेजबाहेर उभ्या असलेल्या मारोती ओमनी (एम.एच.19 क्यु 5638) ला शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागली. पाहता-पाहता आगीचे लोट वाढू लागल्याने आगीच्या विळख्यात संपूर्ण गॅरेजही आल्याने मशनरी व साहित्य जळून खाक झाले. ही घटना गुरूवारी रात्री 8.20 वाजेच्या सुमारास घडली.
माजी नगरसेवकांची आग विझवण्याकामी धडपड
आग लागल्याची माहिती कळताच माजी नगरसेवक पिंटू कोठारी, पिंटू ठाकूर, मयूर अंजाळेकर यांच्यासह अनेकांनी धाव घेतली. जामनेर रोडवरील पालिकेचे अग्निशमन केंद्राचे दोन बंद तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. पोलिसांकडून नेमकी आग कश्यामुळे लागली याचा तपास सुरू आहे. आग लागल्याने या भागात एकच पळापळ झाली.

पाच लाखांहून अधिक नुकसान
न्यु महालक्ष्मी मोटर गॅरेजचे मालक जितेंद्र जैन म्हणाले की, ओमनी उभी असताना अचानक शॉर्ट सर्किट होवून आग पसरली. पाहता-पाहता वाहन जळून खाक झाले व गॅरेजमध्येही आग पसरल्याने सुमारे पाच ते दहा लाखांचे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.







