रावेरात उघड्यावर गोमांस विक्री : नऊ आरोपींना अटक

तीनशे किलो गोमांस जप्त ः रावेर पोलिसांच्या कारवाईने खळबळ


Open sale of beef in Rawer : Nine accused arrested रावेर (3 जानेवारी 2025) : शहरातील कुरेशी मोहल्ल्यात उघड्यावर गोमांसाची विक्री करताना नऊ संशयीतांवर पोलिसांनी कारवाई करीत अंदाजे 296 किलो गोमांस जप्त केले. या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई गुरुवार, 2 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेर शहरातील कुरेशी मोहल्ल्यात काही जण गोमांस कब्जात बाळगून उघड्यावर विक्री करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल मिळाल्याने त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. सहा.निरीक्षक अंकुश जाधव आणि सहकार्‍यांनी कुरेशी मोहल्ल्यात धाव घेतली आणि उघड्यावर गोमांसाची विक्री करणार्‍यांवर धाड टाकून कारवाई केली. त्यांच्याकडून 53 हजार 800 रुपयांचे 296 किलो गोमांस जप्त करण्यात आले. याबाबत महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या संशयीतांविरोधात गुन्हा
पोलिसांनी कलीम खाँ हिरे खाँ, शेख चाँद शेख रेहमान, शेख लाल शेख कडु, शेख समीर शेख नसीर, शेख अल्तमश शेख अखतर, शेख अल्ताफ शेख गफ्फार कुरेशी, शेख लुकमान शेख बिस्मिल्ला कुरेशी, शेख फरिद शेख रहेमान, सोहेल रफिक शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेतील आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

यांनी केली कारवाई
जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव, तपास पथकाचे पोलीस शिपाई प्रमोद पाटील, महेश मोगरे, विशाल पाटील, सचिन घुगे व संभाजी बिजागरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !