भुसावळातील भोळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढली एड्स जनजागृती रॅली


भुसावळ (3 जानेवारी 2025)  : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर ‘युथ फॉर भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी’ हे रविवार, 29 डिसेंबर ते शनिवार, 4 जानेवारीदरम्यान राजोरे येथे सुरू आहे. बुधवार, 1 रोजी एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दुपार सत्रात समुपदेशक आरती चौधरी यांनी मार्गदर्शन केले. दुसर्‍या सत्रात पर्यावरण जागरण प्रतिष्ठान कार्याध्यक्ष प्रा.नाना पाटील यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.राजेश भागवत ढाकेसह कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.जगदीश बन्सीलाल चव्हाण, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.माधुरी अशोक पाटील, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.अनिल साळवे, प्रा.डॉ.संजय बाविस्कर, प्रा.संजय देविदास चौधरी, प्रा.संजय सुदाम पाटील, प्रा.धनश्री पाटील यांनी केले. कार्यक्रमास शिक्षकेतर कर्मचारी प्रकाश चौधरी, रा.से.यो.चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. विशेष प्रशिक्षक व माजी स्वयंसेवक मयूर संजय महाजन यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय धर्मा चौधरी कळवितात.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !