सायकलिंग व योगाभ्यासाद्वारे नवीन वर्षाची सुरुवात

भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम


भुसावळ (3 जानेवारी 2025) : भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनने नववर्षाची नागरिकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी बुधवार, 1 जानेवारी रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. शहरातील रेल्वे स्टेशनच्या उत्तरेकडील बाजूस असलेल्या कृष्णचंद्र सभागृहाशेजारी पहाटे सहा वाजता असोसिएशनचे धावपटू व योगसाधक मैदानावर जमले व प्रा.प्रवीण फालक यांच्या मार्गदर्शनात आरपीडी रस्त्यावर धावायला सुरुवात झाली व धावणे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मैदानावर परतून सर्वांनी योगाभ्यास केला व एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

लेडीज इक्वलिटी रनच्या नाव नोंदणीस सुरुवात’
9 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या लेडीज इक्वलिटी रनची नाव नोंदणी प्रक्रिया 1 जानेवारीच्या मुहूर्तावर सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी 50 हून अधिक महिलांनी यामध्ये नावनोंदणी केली त्यामुळे आयोजकांचा उत्साह अधिकच दुणावला. यावेळी असोसिएशनच्या डॉ.चारुलता पाटील, डॉ.तुषार पाटील, गणसिंग पाटील, प्रवीण पाटील आदी सदस्यांसोबतच धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी छोटू गवळी, किर्ती मोताळकर, मुकेश चौधरी, मनीषा सिंग यांचे सहकार्य लाभले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !