ब्रेकींग न्यूज : दिव्यांग मंत्रालय अध्यक्षपदाचा माजी मंत्री बच्चू कडूंनी दिला राजीनामा


 Former Minister Bachchu Kadu resigns from the post of Chairman of the Ministry of Disabled मुंबई (3 जानेवारी 2025) : दिव्यांगांबाबत राज्य सरकारकडून अपेक्षित पावलं टाकण्यात येत नसल्याचं सांगत माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाी आहे. दिव्यांगांना न्याय देण्यासाठी आता आंदोलन करण्याची वेळ आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
माजी मंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं आहे की, भारतातले पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात निर्माण केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार परंतु अद्यापपर्यंत दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालयाचे काम सुरू झाले नाही. पदावर राहून हे काम होणार, अशी शक्यता मला मावळताना दिसत आहे. दिव्यांगासोबत बेईमानी मला शक्य नाही त्यामुळे मी माझा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान, अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. तो मंजूर करुन सहकार्य करावे, तसेच मला असलेली सुरक्षाही काढून टाकावी व कुठलीही सुरक्षा देण्यात येऊ नये, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.


दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी मला आंदोलने करावी लागणार असून पदावर राहून आंदोलन करणे शक्य नाही, दिव्यांगासोबत बेईमानी कदापि शक्य नाही म्हणून मी माझा राजीनामा देत आहे. तो मंजूर करून सहकार्य करावे, तसेच मला असलेली सुरक्षा काढून टाकावी आणि कुठलीही सुरक्षा ठेवण्यात येऊ नये, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !