महाराष्ट्रातील 10 बड्या अधिकार्‍यांच्या तडकाफडकी बदल्या


मुंबई (3 जानेवारी 2025) : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. यासह अनेक मंत्र्यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारलेला नाही. यावरुन विरोधकांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीतील मंत्र्यांची कानउघाडणी केल्याची माहिती आहे. यासह प्रशासकीय पातळीवर देखील मोठ्या हाचलाली झाल्या आहेत. महाराष्ट्रातील 10 बड्या अधिकार्‍यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्राचा पदभार स्विकारला. तर, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासनात देखील फेरबदल पहायला मिळत आहेत. मंत्रालयात मोठ्या हालचाली पहायला मिळत आहेत. महाराष्ट्र सरकारने काही अधिकार्‍यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. तर, काही अधिकार्‍यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील 10 आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या

1) जयश्री भोज यांची महाआइटी येथून अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

2) सातार्‍याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांची पुणे येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.

3) विनिता वेद सिंघल, प्रधान सचिव, कामगार यांची प्रधान सचिव, पर्यावरण, म्हणून नियुक्ती झाली आहे.

4) आय ए कुंदन, एसीएस स्कूल एज्यु. प्रधान सचिव, कामगार म्हणून नियुक्ती

5) मिलिंद म्हैसकर, अपर मुख्य सचिव, वने आणि महसूल

6) वेणुगोपाल रेड्डी, एसीएस फॉरेस्ट, एसीएस, हायर आणि टेक.एड्यु.

7) निपुण विनायक, रुसा सचिव, पब हेल्थ

8) संतोष पाटील, सीईओ जि.प. पुणे यांची जिल्हाधिकारी, सातारा

9) हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव, सामाजिक न्याय

10) विकासचंद्र रस्तोगी, प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण. प्रधान सचिव, कृषी म्हणून नियुक्ती.


कॉपी करू नका.