तुमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर कुणाची वर्णी ? संभाव्य यादी आली समोर


जळगाव (3 जानेवारी 2025) : मंत्री मंडळ विस्तारानंतर आता पालकमंत्रीपदाच्या निवडीकडे लक्ष लागले आहे. संभाव्य पालकमंत्र्यांची यादी समोर आली असून निवडीकडे आता लक्ष लागले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वबळाचा नारा
महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी बैठकांनंतर पालकमंत्र्यांची नावे निश्चित केली असून पालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमधील पक्ष स्वबळावर लढणार असल्याची शक्यता आहे. या शक्यता लक्षात घेऊनच तिन्ही पक्षांनी आपल्याकडे महत्त्वाचे जिल्हे यावेत यासाठी जोर लावला आहे.

अशी आहे पालकमंत्री पदाची संभाव्य यादी

नागपूर- चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे- एकनाथ शिंदे
पुणे- अजित पवार
बीड- अजित पवार
सांगली- शंभूराज देसाई
सातारा- शिवेंद्रराजे भोसले
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ / अतुल सावे
जळगाव- गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे
यवतमाळ- संजय राठोड / भाजपाचा दावा देखील आहे
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
अहमदनगर- राधाकृष्ण विखे पाटील
अकोला- माणिकराव कोकाटे
अमरावती- चंद्रकांत पाटील
भंडारा- राष्ट्रवादी अजित पवार
बुलढाणा- आकाश फुंडकर
चंद्रपूर- नरहरी झिरवळ
धाराशीव- धनंजय मुंडे
धुळे- जयकुमार रावल
गडचिरोली- एकनाथ शिंदे
गोंदिया- राष्ट्रवादी अजित पवार
हिंगोली- आशिष जैस्वाल
लातूर- गिरीष महाजन
मुंबई शहर- योगेश कदम
मुंबई उपनगर- मंगलप्रभात लोढा
नांदेड- भाजपाकडे राहिल
नंदुरबार- भाजपाचा दावा
नाशिक- दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा
पालघर- गणेश नाईक
परभणी- मेघना बोर्डीकर
रायगड- भरत गोगावले / राष्ट्रवादीचा दावा कायम
सिंधुदुर्ग- नितेश राणे
रत्नागिरी- उदय सामंत
सोलापूर- जयकुमार गोरे
वर्धा- पंकज भोयर
वाशिम- माधुरी मिसाळ / इंद्रनील नाईक
जालना- अतुल सावे
लातूर- बाळासाहेब पाटील


कॉपी करू नका.