भुसावळात नॉयलॉन मांजाची विक्री : विक्रेत्याविरोधात गुन्हा


भुसावळ (4 जानेवारी 2025) : बंदी असलेल्या नॉयलॉन मांजाची विक्री करताना भुसावळातील पतंग गल्लीतील विक्रेत्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे गोपाल पोपट गव्हाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 2 रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास संशयीत अजय सदाशीव चौरसिया (36, भजेगल्ली, भुसावळ) हा सराफ बाजाराजवळील भजे गल्लीत बंदी असलेल्या नॉयलॉन मांजा बाळगताना आढळल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या ताब्यातून एकूण एक हजार पाचशे रुपये किंमतीच्या नॉयलॉन मांजाच्या चक्री जप्त करण्यात आल्या. तपास हवालदार तेजस पारिसकर करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !