खडका केंद्रातून 48 हजारांचे कॉपर रॉड लांबवले


भुसावळ (4 जानेवारी 2025) : खडका येथील 400 केव्ही ग्रहण केंद्रातून 48 हजार रुपये किंमतीचे कॉपर रॉड लांबवले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अतिरीक्त कार्यकारी अभियंता विवेक अशोक नेहते (शांतीनगर, भुसावळ) यांनी तालुका पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, खडका सबस्टेशन येथून 2 जानेवारी रोजी 3.13 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तीन आयसूलेटरचे 60 किलो वजनाचे व 48 हजार रुपये किंमतीचे कॉपर कॉड लांबवले. तपास ग्रेडेड उपनिरीक्षक कंखरे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !