दिड महिन्यांपूर्वी मुलाचा मृत्यू आता डोळ्यादेखत पतीही बुडाला : यावलमध्ये शोककळा


Son died 1.5 months ago, now husband drowns before our eyes: Mourning in Yaval जळगाव (5 जानेवारी 2025) : लमांजन गावाजवळील गिरणा नदीपात्रातून जाताना नदीतील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बुडून एका प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 4 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. दीड महिन्याभरापूर्वी मुलाचा मृत्यू झाल्यानंतर हा मानसिक आघात सोसत नाही तोच डोळ्यादेखत पतीचाही मृत्यू झाल्याने पत्नीला मोठा मानसिक धक्का बसला. ाप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पांडुरंग नामदेव मराठे (59, रा.शिवाजीनगर, यावल) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

दिड महिन्यांपूर्वीच मुलाचा मृत्यू
पांडुरंग मराठे हे पत्नी आशाबाई यांच्यासह यावलला राहत होते. दीड महिन्यापूर्वी 24 नोव्हेंबर रोजी पांडुरंग मराठे यांचा मुलगा मनोज हा जळगावात गणेश कॉलनी परिसरात सेंट्रिंगचे काम करताना पडून मृत्युमुखी पडला होता. शनिवार, 4 जानेवारी रोजी पांडुरंग मराठे हे पत्नी आशाबाई यांच्यासह एरंडोल तालुक्यात खर्ची येथे आले होते. तेथून लमांजन येथील नातेवाईक गोकुळ मराठे यांचेकडे जाण्यासाठी निघाले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास गिरणा नदी ओलांडत असताना नदीत वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यामध्ये ते पडले. पाणी खोल असल्याने ते बुडायला लागले.


दरम्यान, पत्नी आशाबाई यांनी आरडा-ओरड केली. परिसरातील ग्रामस्थ धावून आले. त्यांनी पांडुरंग मराठे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी त्यांच्या पत्नीने मन हेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !