धरणगावच्या महावीर कॉटन जिनिंग फॅक्टरीमधून पाच लाखांची रोकड लांबवली


Five lakhs in cash stolen from Mahavir Cotton Ginning Factory in Dharangaon धरणगाव (5 जानेवारी 2025) : भोद शिवारातील महावीर कॉटन जिनिंग फॅक्टरीमधून चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून पाच लाख 30 हजार 760 रुपयांची रोकड लांबवल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले नेमके ?
धरणगाव तालुक्यातील भोद खुर्द शिवारात संजय समीरमल ओस्तवाल (58, रा.धरणगाव) यांची महावीर कॉटन नावाची कापसाची जिनिंग फॅक्टरी आहे. 2 जानेवारी ते 3 जानेवारी दरम्यानच्या काळामध्ये फॅक्टरी बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालयाच्या खोलीतून पाच लाख 30 हजार 760 रुपये रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. चोरीनंतर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी संजय ओस्तवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री 10 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !