पाळधीजवळ टँकर उलटताच पाम तेल मिळवण्यासाठी उडाली झुंबड


जळगाव (5 जानेवारी 2025) : सुसाट वेगाने पामतेल घेवून निघालेल्या टँकरवरील नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला. हा अपघात जळगाव-धुळे महामार्गांवरील पाळधी गावाजवळ शनिवारी रात्री घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसलीतरी मोठ्या प्रमाणात पामतेल सांडले गेल्याने ग्रामस्थांनी मिळेल त्या भांड्यात तेल साठवण्याचा प्रयत्न केला.

अपघातानंतर ग्रामस्थांची धाव
पामतेल महामार्गावर पसरराच ग्रामस्थांनी तत्काळ अपघात स्थळाकडे धाव घेतली. ग्रामस्थांची तेल गोळा करण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. ग्रामस्थांनी त्यांना मिळेल त्या भांड्यात तेल घ्यायला सुरुवात केली. ही परिस्थिती गंभीर होती त्यातच महामार्गावर साचलेल्या तेलामुळे रस्त्यावर गोंधळ निर्माण झाला.


या अपघातात चालक थोडक्यात बचावला. हा मोठा अपघात झाला असला तरी या अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला नाही.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !