शेतजमीन वर्ग करताना शासनाची फसवणूक : दोषींवर कारवाईसाठी केदार सानप यांचे 26 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण


मुक्ताईनगर (5 जानेवारी 2025) : मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हाकाकोडा येथील गट 167 पैकी 51 व काकोडा 167 पैकी 36, 167 पैकी 27 यामधील वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रुपांतर करतांना पंकज लोखंडे व वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचार्‍यांनी मिळून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप असून या संदर्भात भुसावळातील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे.

दोषींवर कारवाईची मागणी
दोषींवर कारवाईबाबत अपर मुख्य सचिव व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी व तहसीलदार मुक्ताईनगर यांच्याकडे तक्रार केल्यानंतरही कुठलीही कारवाई न झाल्याने सानप हे 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे. 19 एप्रिल 2024 रोजी अपर मुख्य सचिव व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी व तहसीलदार मुक्ताईनगर यांच्याकडे पंकज लोखंडे व वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी यांनी शासनाची फसवणूक केल्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी तक्रार अर्जान्वये केली. अर्जाची दखल घेत विभागीय आयुक्तांनी कारवाईचे आदेश देत तक्रारदाराला आपल्या स्तरावरून कळवण्याचे जिल्हाधिकार्‍यांना सूचित केले मात्र अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही.


अधिकार्‍यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप
समिती अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्यातील तरतूदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्त्यांना कळविण्यात आल्याने केदार सानप यांनी 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे. त्या संदर्भात त्यांनी पोलीस व प्रशासनाला रितसर पत्रही दिले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !