कामगार युनियन अध्यक्षपदी आशीश मोरे तर महासचिवपदी दिनेश राजगीरे
भुसावळ (5 जानेवारी 2025) : भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा 3 रोजी कामगार भवन, युनियन कार्यालयात झाली. संघटनेचे गेल्या वर्षभरातील कार्याची माहिती महासचिव दिनेश राजगिरे यांनी दिली. विविध प्रस्ताव पारीत होवून चर्चा करण्यात आली. आगामी काळासाठी पदाधिकारी निवडण्यात आले.
अध्यक्षपदी आशिष मोरे
कामगार युनियन अध्यक्षपदी आशिष मोरे, कार्याध्यक्षपदी निलेश देशमुख, उपाध्यक्षपदी मिलेश देवराळे, नितीन दत्तु पाटील, संजय लोखंडे, ज्ञानदेव सरोदे, हितेंद्र पाटील, महासचिवपदी दिदनेश राजगीरे, संयुक्त सचिवपदी मोहन सपकाळे, हरीश बावस्कर, संघटन सचिवपदी शैलेंद्र पवार, शरद गुप्ता, आर.बी.वाणी, धनंजय पिंपळे, रवी सपकाळे, जितेंद्र मोरे, जावेद तडवी, प्रचार सचिवपदी गजानन इंगळे, गिरीश येवले, प्रवीण बोहित, विकास भटकर, हरिचरण बेलकर, प्रसाद भावसार, अनिल गरुड, खजिनदार संतोष बाविस्कर, सहखजिनदार रोशन चौधरी, ऑडिटर किशोर बढे, ऑफिस सेक्रेटरी बिस्मिल्ला तडवी, संजय पाथरवट, महिला आघाडी रेखा आव्हाड. निवडणुकीचे कामकाज वरीष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी मोहम्मद आरिफ व न्यु वर्कर्स क्रे को ओप. सोसा.चे प्रबंधक गणेश पाटील यांनी पाहिले.





