पोलिसात केलेली तक्रार माघारी न घेतल्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
अमळनेर (5 जानेवारी 2025) : अमळनेर तालुक्यातील एका गावात झालेल्या वादातून पोलिसात केलेली तक्रार मागे घेतली नाही म्हणून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवार, 3 रोजी घडली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने मारवड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
3 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता फिर्यादी महिला गच्चीवर कपडे टाकायला गेली होती. तिची 11 वर्षीय मुलगी लहान भावाला झोक्यात झोपवून झोका देत होती. मुलीचा अचानक ओरडण्याचा आवाज आल्याने महिला घरात आली असता भाऊसाहेब उर्फ प्रशांत अशोक बोरसे हा झोक्याजवळ आक्षेपार्ह कृत्य करताना दिसून आला. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून गेला.
मुलीने सांगितल्यानुसार या महिलेने जाब विचारला असता भाऊसाहेब याची आई उषाबाई बोरसे हिने काहीही ऐकून न घेता शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मागील तक्रार मागे न घेतल्यास आपण असेच करत राहू, अशी धमकी महिलेला दिली. या महिलेने 4 रोजी मारवड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोक्सोसह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहेत