थंडीचा कडाका आणखीन वाढणार ! : राज्यातील सर्वाधिक नीचांकी तापमान धुळ्यात


धुळे (5 जानेवारी 2025)  : पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस आणि हिमवर्षाव होत असून आगामी दोन दिवसात थंडीचा कडाका आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी राज्यातील सर्वाधिक कमी नीचांकी तापमान 6.8 अंश नोंदवण्यात आले.

आगामी दोन दिवस थंडीचा जोर राहणार
पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रामध्ये थंडीचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार धुळे राज्यातील सर्वात निचांकी तापमान नोंद होण्याची शक्यता आहे. धुळ्यात 6.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर त्यानंतर निफाड अहिल्यानगर, पुणे, जळगाव, नागपूर, गोंदिया येथील पारा देखील दहा अंशाच्या खाली उतरला आहे. काही ठिकाणी धुक्यासह दव देखील पडल्याचे दिसून आले आहे. अशीच परिस्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार असल्याची शक्यता हवामाना विभागाने वर्तवली आहे.


कॉपी करू नका.