भुसावळात लेवा समाजाच्या परिचय मेळाव्यात 27 युवक-युवतींचा परिचय

व्यावसायीकासह शेतकरी वरालाही द्यावे प्राधान्य : मंत्री रक्षा खडसे


भुसावळ (6 जानेवारी 2025) : अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ व बहिणाई ब्रिगेडतर्फे लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींचे परिचय संमेलन रविवार, 5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शहरातील संतोषी माता हॉलमध्ये झाले. यावेळी समाजातील 27 युवक-युवतींनी आपला परिचय दिला. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व मंत्री रक्षा खडसे यांचा सत्कार करण्यात आला.

वधू-वर सुचीचे प्रकाशन
कार्यक्रमात शैक्षणिक व कौटुंबिक माहिती असलेल्या परिचय सूचीचे व प्रा.सुनीता येवले यांच्या दोन काव्य संग्रालयाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बहिणाई ब्रिग्रेड भुसावळ या शाखेची घोषणा करून अध्यक्ष पद हे मनीषा पाटील यांना सोपविण्यात आले. प्रास्ताविक अ‍ॅड.प्रकाशराव पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी आमदार एकनाथराव खडसे होते. प्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा सन्मानपत्र देऊन भव्य नागरी सत्कार करण्यात आला.


मोठ्या शहराचा अट्टाहास टाळा : रक्षा खडसे
समाजातील मुलींना केवळ नोकरीवाल्या मुलांपेक्षा शेतकरी व व्यावसायीक मुलांनाही प्राधान्य द्यायला हवे. आर्थिक स्थितीपेक्षा परिवार संस्कारी असायला हवा. आजकाल मोठ्या शहरांप्रमाणे लहान शहरांमध्ये ही सर्व सुख सुविधा उपलब्ध असल्याने मुलींनी केवळ मोठ्या शहराचा अट्टाहास टाळावा, असे आवाहन मंत्री रक्षा खडसे यांनी केले.

आर्थिक सुबत्तेपेक्षा संस्कार महत्त्वाचे : आमदार एकनाथराव खडसे
आमदार एकनाथराव खडसे म्हणाले की, विवाह टिकण्यासाठी आर्थिक सुबत्तेपेक्षा संस्कार महत्त्वाचे आहेत. असे सुसंस्कार आई-वडिलांनी आपल्या मुला-मुलींवर करावे. शेतकरी ही मेहनत करून नोकरदाराप्रमाणेच आर्थिक स्थिती मजबूत करू शकतो म्हणून शेतकरी मुलांचाही मुलींनी विचार करावा. कार्यक्रमात 27 उपवर-वधूंनी आपला परिचय दिला. विविध शहरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सामूहिक विवाह सोहळा जळगाव येथे घेण्याची घोषणा करण्यात आली.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमांस कुटुंबप्रमुख ललित पाटील, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, वासु इंगळे, केंद्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाशराव पाटील, उपाध्यक्ष राजेश सुधाकर चौधरी, किरण कोलते, अ‍ॅड.बोधराज चौधरी, गिरीश महाजन, परीक्षीत बर्‍हाटे, प्रदीप भोळे, बहिणाबाई ब्रिगेड अध्यक्ष आशा कोल्हे, स्वाती भोळे, मधुकर सरोदे, जगन्नाथ किनगे व समाजातील इतर मान्यवर व्यापीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.मुकेश चौधरी यांनी करून आभारही मानले.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
यशस्वीतेसाठी शहराध्यक्ष देवा वाणी, श्याम भारंबे, रुपेश चौधरी, शुभम पाटील, डॉ.बाळू पाटील, गिरीश चौधरी, कोमल चौधरी, संकल्प वाणी, कल्पेश पाटील, रजत बढे, सुमित बर्‍हाटे, लोकेश बेंडाळे, ओम वाणी, अभिराज वाणी, निलेश राणे, अविनाश बर्‍हाटे, गौरव ढाके, ऋतिक फालक, यशांक पाटील आदींनी परिश्रम घेतले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !