धनंजय मुंडेंना पाठीशी घातल्यास राज्यभरात आंदोलन : मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा
Protests across the state if Dhananjay Munde is supported : Manoj Jarange-Patil warns पुणे (6 जानेवारी 2025) : मराठा समाजाचे नेते यांनी बीड सरपंच हत्याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना पाठीशी घातल्यास राज्यात आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपण त्यांच्या मागे नसल्याचे दाखवून द्यावे तसेच न केल्यास आंदोलनाचे लोन राज्यभर उभारू असा इशाराच त्यांनी दिला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले की, हत्येतील आरोपी पुण्यातच कसे सापडतात असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना शनिवारी रस्त्यावर फिरू न देण्याचा इशारा दिला होता.

तर आम्हाला जातीयवादी म्हणताय
मनोज जरांगे म्हणाले की, धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा की नाही हा आमचा प्रश्नच नाही. त्यांनी जातीय तेढ निर्माण करू नये. आम्ही संतोष देशमुख यांना न्याय मागितला तर आम्हाला जातीयवादी म्हणले जात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. हे नवीन षडयंत्र असल्याचा दावादेखील त्यांनी केला आहे. मात्र, यातील एकही आरोपी बाहेर आला तर सरकारला सोडणार नसल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. समाजावरती आणि माता माऊलींवर अन्याय होत असेल तर जशाला तसे उत्तर द्यायचे, असे आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केले आहे.




