जळगाव तरुण भारतचे संपादक चंद्रशेखर जोशी यांना ‘दर्पणकार’ पुरस्कार प्रदान


जळगाव (6 जानेवारी 2025) : पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने जिल्ह्यातील पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन 6 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात करण्यात आले. यावेळी जळगाव तरुण भारतचे वरिष्ठ संपादक चंद्रशेखर जोशी यांना मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते ‘दर्पणकार’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

गुलाबराव म्हणाले, आमच्यातही नाही का स्पर्धा
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटलच्या युगात प्रिंट मीडिया कितपर्यंत तग धरते हे मोठे आव्हान प्रिंट मीडिया समोर आहे. रात्रीची खिचडी ही सकाळी गरम करून खावी तशी परिस्थिती यांची झाली आहे मात्र सकाळी खिचडी गरम करताना काही आलेल्या बातमीतील महत्त्वाचे राहिले आहे का ती चौकट सकाळी प्रिंट दिली जाते. प्रत्येक धंद्यात आता स्पर्धा आहे, आमच्यात पण नाही का? आता यावर्षी बंपर मेजॉरिटी आल्यामुळे आधी सव्वाचार आमदारांमध्ये मंत्री आता सव्वासात आमदारांमध्ये मी मंत्री झालो आहे.


या मान्यवरांची असेल उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे होते. असतील. दर्पणकार पुरस्कार वितरण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आय.जी.दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते हेल्मेटचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, आमदार राजूमामा भोळे यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदींची उपस्थिती होती.

10 पत्रकारांना ‘दर्पणकार’ पुरस्काराने सन्मान
पुरस्कार विजेत्या पत्रकारांमध्ये प्रिंट मीडियातून- चंद्रशेखर जोशी (तरुण भारत), सुनील पाटील (लोकमत), सुधाकर जाधव (दिव्य मराठी), चेतन साखरे (देशदूत), इलेक्ट्रॉनिक मीडिया- किशोर पाटील (किशोर पाटील), संजय महाजन (साममत), विजय वाघमारे (न्यूज 18 लोकमत), डिजिटल मीडिया- नरेंद्र पाटील, पुढारी (डिजिटल) , निलेश पाटील (महाराष्ट्र टाइम्स डिजिटल) व छायाचित्रकार- सचिन पाटील (लोकमत) यांना सन्मानीत करण्यात आले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !