पुन्हा नक्षलवाद्यांचा हल्ला : नऊ जवान शहीद
Naxalites attack again : Nine soldiers martyred विजापूर (6 जानेवारी 2025) : नक्षलवाद्यांनी आयडी स्फोट घडवत वाहन उडवल्याने या हल्ल्यात नऊ जवान शहीद झाले आहे. छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात सोमवारी रात्री सव्वादोन वाजता ऑपरेशनहून परतणार्या जवानांच्या वाहनाला टार्गेट करण्यात आले.
नक्षलवाद्यांनी घडवला आयईडी स्फोट
बस्तर रेंजचे आयजी सुंदरराज पी यांनी सांगितले की, विजापूरमधील संयुक्त ऑपरेशन पार्टी ऑपरेशननंतर परतत होती. सोमवारी दुपारी 2.15 च्या सुमारास नक्षलवाद्यांनी आंबेली गावाजवळ आयईडी स्फोट घडवून आणला. स्फोट इतका भीषण होता की रस्त्यावर सुमारे 10 फूट खोल खड्डा तयार झाला आणि वाहनाचे तुकडे झाले. वाहनाचे काही भाग 30 फूट अंतरावर 25 फूट उंचीवर असलेल्या झाडावर आढळून आले.





विजापूरमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दंतेवाडा डीआरजी (जिल्हा राखीव गार्ड) चे नऊ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात चालकाचाही मृत्यू झाला आहे. दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूर येथे संयुक्त कारवाई करून हे सर्वजण परतत होते.
नक्षल एडीजी विवेकानंद सिन्हा यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी रात्री 2.15 च्या सुमारास हल्ला केला. विजापूरच्या कुतुर रस्त्यावर आयईडीचा स्फोट करुन नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांचे वाहन टार्गेट केले. त्या वाहनात 9 पेक्षा जास्त जवान होते. हा स्फोट इतका भयंकर होता की रस्त्यावर भलामोठा खड्डा पडला आहे. स्फोटात छिन्नविछिन्न अवस्थेत जवानांचे मृतदेह सापडलेत.
