कुर्हा विद्यालयाच्या हिवाळी शिबिराचे वडोद्यात उद्घाटन
मुक्ताईनगर (6 जानेवारी 2025) : प.पू.माधव सदाशीव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुर्हाकाकोडा येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर वडोदा येथे 3 ते 9 दरम्यान सुरू आहे. युथ फॉर माय भारत व युथ फॉर माय डिजिटल लिटरसी या संकल्पनेवर आधारित श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक चंद्रभान दामूजी इंगळे यांच्याहस्ते झाले.
यांची होती उपस्थिती
संस्थाध्यक्ष प्रमोद शिवलकर, बेटी बचाव बेटी पढाव संयोजक डॉ.राजेंद्र फडके, सचिव भालचंद्र कुलकर्णी, प्रल्हाद बढे, प्राचार्य पिंगळे, प्रा.मनोज वाघ, प्रकाश भोईर, सर्व सन्माननीय संचालक उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.मनोज वाघ यांनी केले. डॉ.राजेंद्र फडके यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून समाजातील अनिष्ट रूढी प्रथा परंपराविषयी, पर्यावरणाविषयी, मतदानाविषयी जनजागृती करून सामाजिक कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन केले. संस्थाध्यक्ष शिवलकर यांनी विद्यार्थ्यांनी स्वावलंबी व आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन केले. स्वप्ना संदीप खिरोळकर यांनी युवकांनी सक्षम व्हावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.न्हावी यांनी तर रासेयो महिला सहायक कार्यक्रमाधिकारी प्रा.गीता वाघ यांनी आभार मानले.
विनोद पाटील, संदीप खिरोडकर, सीताराम टावरी, मुख्याध्यापक सुनील उन्हाळे, शत्रुघ्न भोई, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.