चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची मोठी कामगरी : एक लाख 20 हजारांची रक्कम लांबवणार्‍या भामट्यांना बेड्या


जळगाव (7 जानेवारी 2025) : चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी एक लाख 20 हजारांची रोकड चोरी केल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. मंगेश राजेंद्र शेलार (39) आणि निलेश अनिल मोरे (29, पिंपळगाव, ता.चाळीसगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

काय घडले नेमके
पिंपळगाव येथील सुनील फकिरा काकडे यांनी मोलमजुरी करुन जमवलेली एक लाख 20 हजाराची रक्कम घरातील कोठीत ठेवली होती. सुनील काकडे हे पत्नीसह 2 रोजी मोलमजुरी करण्यासाठी घरातून बाहेर गेल्यानंतर त्यांच्या घरातील कोठीत ठेवलेली रक्कम चोरी झाली होती. घराच्या खिडकीची ग्रील तोडून आत प्रवेश करुन कुणीतरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोघांना बेड्या, रोकड जप्त
तपासाअंती या गुन्ह्यातील संशयीत मंगेश राजेंद्र शेलार यास ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने हा गुन्हा निलेश मोरे याच्या मदतीने केल्याचे कबुल करताच दोघांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून एक लाख 13 हजारांची रोकड जप्त करण्यात आली. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

 


कॉपी करू नका.