दिल्ली-एनसीआर, बिहारसह पश्चिम बंगालला भूकंपाचे धक्के


नवी दिल्ली (7 जानेवारी 2025)  : दिल्ली-एनसीआर, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी 6.35 वाजता नागरिक झोपेत असताना त्यांना भूकंपाचे धक्के जाणवले.

भारतातील नेपाळ, भूतान, सिक्कीम आणि उत्तराखंडमध्येही भूकंपाचा प्रभाव दिसून आला. सध्या भारतात भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. नेपाळ आणि चीनमध्ये आतापर्यंत नुकसानीचे कोणतेही वृत्त नाही.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.1 होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू चीनमधील शिजांग येथे जमिनीपासून 10 किलोमीटर खाली होता.

22 जानेवारी 2024 रोजी रात्री 11.39 वाजता चीन-किर्गिस्तान सीमेवर 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. दक्षिण शिनजियांगमध्ये झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 22 किमी खाली होता. या भूकंपात अनेक इमारती कोसळल्या असून अनेक लोक जखमी झाले होते.


कॉपी करू नका.