दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी निवडणूक, 8 ला निकाल
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची घोषणा
दिल्ली (7 जानेवारी 2025) : दिल्ली विधानसभेसाठी 70 जागांसाठी पुढील महिन्यात 5 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असून 8 रोजी निकाल जाहीर होईल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी केली.
एकाच टप्प्यात निवडणूक
दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. 1.5 कोटी हून अधिक उमेदवार दिल्लीत आहेत. 2.08 लाख मतदार असे आहेत जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. एका टप्प्यात दिल्लीची निवडणूक होणार आहे. 5 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार तर 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे अशी घोषणा





