छत्रपती संभाजीनगरात ऑनर किलींगने खळबळ


Honor killing creates stir in Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर (7 जानेवारी 2025) : प्रेमसंंबंधाच्या वादातून चुलत भावाने बहिणीची डोंगरावरून धक्का देत हत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी घडली. 200 फूट उंचावरून खाली पडल्याने तरुणीचा मृत्यू झाला. नम्रता गणेशराव शेरकर (17, रा. शहागड, श्रीराम कॉलनी, ता.अंबड, जि.जालना) असे मृत तरुणीचे नाव आहे तर ऋषिकेश तानाजी शेरकर (25, रा.वळदगाव) असे आरोपी भावाचे नाव आहे.

काय घडले नेमके ?
नम्रताचे एका मुलावर प्रेम होते. त्यातूनच तिचे घरच्यांशी खटके उडत होते. यामुळे घरच्यांनी तिला शहागड येथून वळदगाव येथे चुलते तानाजी शेरकर यांच्याकडे पाठवले होते. दरम्यान सोमवारी चुलत भाऊ ऋषिकेश याने बाहेर फिरायला जाऊन येऊ असे सांगत नम्रतास दुचाकीवरून परिसरातील खवड्या डोंगर येथे आणले. यावेळी डोंगराच्या टोकावर असणार्‍या सर्वात अवघड जागेवर ऋषिकेशने तिला नेले. येथे गप्पा मारण्याचा बहाणा करत ऋषिकेशने बेसावध नम्रतास अचानक धक्का देऊन डोंगरावरुन खाली ढकलले.


तब्बल 200 फुट उंचावर खाली पडल्याने नम्रताचा जागीच मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्यासह हवालदार राजेभाऊ कोल्हे, बाळासाहेब आंधळे आदींसह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत मुलीचा मृतदेह पोलिसांनी घाटी रुग्णालयात रवाना केला. पोलिसांनी आरोपी ऋषीकेश शेरकर यास ताब्यात घेतले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !