भुसावळातील सेंट अलॉयसीस शाळेत 10 रोजी हेल्मेट वाटप


Helmet distribution at St. Aloysius School in Bhusawal on the 10th भुसावळ (7 जानेवारी 2025)  : राष्ट्रीय महामार्गासह इतर मार्गावरील अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाकडून वाहन चालक व मालकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. याच अनुषंगाने वाहतूक नियमांबाबत जनजागृती करून रस्ता सुरक्षा महिना साजरा करण्यात येत आहे. पाळधी महामार्ग वाहतूक पोलिसांकडून शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळील सेंट अलॉयसीस शाळेत वाहतूक नियमांबाबत जनजागृती व हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम शुक्रवार, 10 रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे.

चिमुकल्यांकडून होणार पालकांचे प्रबोधन
रस्ते अपघातात बहुतांश दुचाकी चालक व त्यांच्यामागील व्यक्ती हेल्मेट परिधान करीत नसल्याने अपघातात मृतांचा व जखमींचा आकडा वाढतो. वयस्क व्यक्ती हेल्मेट घालत नसल्याने शाळेतील चिमुकल्यांना हेल्मेट देवून त्यांच्याकडून आता पालकांचे प्रबोधन केले जाणार आहे. परिणामी हेल्मेटबाबत जागरुकता निर्माण होवून हेल्मेटचा वापर वाढणार आहे. शाळेतील मुलांना हेल्मेट वाटप करण्याची संकल्पना आयसीआयसीआय लोबांर्ड, मुंबई यांनी ठेवली आहे.

यांची असेल उपस्थिती
हेल्मेट वाटप कार्यक्रमास नाशिक महामार्गर्च पोलीस उपअधीक्षक कुसूम कदम,
भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, धुळे महामार्गचे पोलीस निरीक्षक गोप नारायण, महामार्ग पोलीस पाळधीचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद वली सैयद, आयसीआयसी आय लोबांर्ड मुंबई कंपनीचे नझीम खान हे उपस्थित राहून मुलांना वाहतुकीचे नियमांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.


कॉपी करू नका.