पिस्टलाच्या धाकावर घरफोड्या करणार्या अट्टल आरोपीला बेड्या
धुळे गुन्हे शाखेसह पिंपळनेर पोलिसांची कारवाई : शस्त्रासह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
A stubborn accused who broke into a house at gunpoint is in custody धुळे (7 जानेवारी 2025) : पिस्टलाच्या धाकावर घरफोड्या करणार्या अट्टल आरोपीला धुळे गुन्हे शाखेसह पिंपळनेर पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली. आरोपीने पिंपळनेर हद्दीत तीन घरफोड्या केल्याची कबुली देत मुद्देमालही काढून दिला. रमेश शिवा वसावा (41, गव्हाण, ता.उच्छल, जि.वाणी, गुजरात) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, आरोपीविरोधात यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत.
पिंपळनेर हद्दीतील गुन्हे उघडकीस
29 डिसेंबर रोजी सामोडे शिवारातील शाम शांताराम भदाणे (सामोडे) यांच्या लक्ष्मी अॅग्रा इंण्डस्ट्रीजमधून दोन लाख 17 हजार 800 रुपये किंमतीचे वेल्डींग मशीन, रोटर, नांगर, कल्टीवेटर आदी साहित्य चोरीस गेल्याने पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांना या गुन्ह्याची संशयीताची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकास निर्देश दिल्यानंतर रमेश शिवा वसावा यास अटक करण्यात आली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली तसेच सामोडे रस्त्यावरील कांद्याच्या चाळीजवळील शेतातून सोयाबीन तसेच बोपखेल येथील प्रभात बिअर शॉपीमधून इन्व्हर्टर व बॅटरी लांबवल्याचा गुन्हादेखील उघडकीस आला. आरोपीच्या ताब्यातून एक कट्टा व एक काडतूससह चोरी केलेला दोन लाख 42 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार, पिंपळनेरचे सहाय्यक निरीक्षक किरण बर्गे, उपनिरीक्षक ईश्वर शिरसाठ, संजय पाटील, सदेसिंग चव्हाण, तुषार सूर्यवंशी, देवेंद्र ठाकूर, निलेश पोतदार, सुनील पाटील, अतुल निकम, हर्षल चौधरी, चालक हवालदार कैलास महाजन, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे चेतन गोसावी, रवींद्र सूर्यवंशी, पंकज, कैलास कोळी आदींच्या पथकाने केली.





